१)
प्रवाहाच्या विरुद्ध विचार करा
गुंतवणूकदारांनी अफवांच्या मागे धावू न धावता
थोडा अभ्यास करून प्रवाहाच्या विरुद्ध चालावे.
उदा.:
सन २००० च्या सुरुवातीस आय.टी. क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली. मात्र त्यानंतर
बाजार २५ ते ९० % कोसळला. अनेकांना त्याचा फटका बसला. जर एखाद्याने प्रवाहाच्या
विरुद्ध जाऊन लवकर शेअर विकले असते किंवा आय.टी. वगळून अन्य कंपनीत पैसे टाकले
असते तर मोठे नुकसान टळले असते.
२)
भक्कम कंपन्या खरेदी करा.
एखाद्या कंपनीच्या मिळकत वाढत आहे का? शेअर
वाढतो आहे का? इक्विटी परतावा चांगला आहे का? इत्यादी कंपनीच्या प्रगतीकडे
गुंतवणुकदारांनी लक्ष ठेवावे. अशा भक्कम कंपन्याचे शेअर्स खरेदी करा.
३) मूल्य तपासा
एखाद्या कंपनीच्या विविध प्रमाणांचा अभ्यास
करावा. उदा.: पी/ई. गुणोत्तर ई. ज्यांचे प्रमाण चांगले व सातत्यपूर्ण असेल तर त्या
कंपनीचे शेअर्स चांगला फायदा देतात.
४) तुम्हाला जे पूर्ण
ज्ञान आहे, तेच खरेदी करा.
ज्या व्यवसायाचे ज्ञान नाही त्यात सहसा
गुंतवणूक करू नका. जी कंपनी माहित असते तिचा व्यवसाय कसा चालतो फायदा कसा व कधी
बनतो याचे ज्ञान असेल तर चांगला फायदा मिळतो. म्हणून ज्याबाबत ज्ञान असते त्यात
पैसे गुंतवा.
५) व्यवस्थापन
अभ्यासा.
ज्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर त्याचा
अभ्यास करा. कंपनीच्या मेनेजमेंटचा अभ्यास करावा. काही मेनेजमेंट खराब स्थितीतही
कंपनीला स्थिर ठेवतात व फायदा मिळवून देतात. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापनचा अभ्यास
करा.
६) दीर्घकाळासाठी
गुंतवणूक करा.
थोडा अभ्यास केला व भक्कम कंपनी निवडली
तर तुम्ही धीर धरा. घाई करून शेअर विकू
नका. दीर्घकाळ गुंतवणूक केली तर निश्चीतच फायदा होतो.