गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

गुंतवणुकीची बेसिक तत्वे


१) प्रवाहाच्या विरुद्ध विचार करा
    गुंतवणूकदारांनी अफवांच्या मागे धावू न धावता थोडा अभ्यास करून प्रवाहाच्या विरुद्ध चालावे.
उदा.: सन २००० च्या सुरुवातीस आय.टी. क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली. मात्र त्यानंतर बाजार २५ ते ९० % कोसळला. अनेकांना त्याचा फटका बसला. जर एखाद्याने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन लवकर शेअर विकले असते किंवा आय.टी. वगळून अन्य कंपनीत पैसे टाकले असते तर मोठे नुकसान टळले असते.



२) भक्कम कंपन्या खरेदी करा.
    एखाद्या कंपनीच्या मिळकत वाढत आहे का? शेअर वाढतो आहे का? इक्विटी परतावा चांगला आहे का? इत्यादी कंपनीच्या प्रगतीकडे गुंतवणुकदारांनी लक्ष ठेवावे. अशा भक्कम कंपन्याचे शेअर्स खरेदी करा.


३) मूल्य तपासा
    एखाद्या कंपनीच्या विविध प्रमाणांचा अभ्यास करावा. उदा.: पी/ई. गुणोत्तर ई. ज्यांचे प्रमाण चांगले व सातत्यपूर्ण असेल तर त्या कंपनीचे शेअर्स चांगला फायदा देतात.




४) तुम्हाला जे पूर्ण ज्ञान आहे, तेच खरेदी करा.
    ज्या व्यवसायाचे ज्ञान नाही त्यात सहसा गुंतवणूक करू नका. जी कंपनी माहित असते तिचा व्यवसाय कसा चालतो फायदा कसा व कधी बनतो याचे ज्ञान असेल तर चांगला फायदा मिळतो. म्हणून ज्याबाबत ज्ञान असते त्यात पैसे गुंतवा.
 
५) व्यवस्थापन अभ्यासा.
    ज्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर त्याचा अभ्यास करा. कंपनीच्या मेनेजमेंटचा अभ्यास करावा. काही मेनेजमेंट खराब स्थितीतही कंपनीला स्थिर ठेवतात व फायदा मिळवून देतात. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापनचा अभ्यास करा.



६) दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा.
    थोडा अभ्यास केला व भक्कम कंपनी निवडली तर  तुम्ही धीर धरा. घाई करून शेअर विकू नका. दीर्घकाळ गुंतवणूक केली तर निश्चीतच फायदा होतो.

 


रविवार, १ मे, २०११

महत्वाच्या कंपन्या



क्रमांक
००१
कंपनीचे नाव
रिलायन्स इंडस्ट्रीज
बिझिनेस ग्रुप
मुकेश अंबानी ग्रुप
स्थापना
१९६६
क्षेत्र
डायव्हर्सीफाईड- १) पेट्रोकेमिकल्स, रीफायनिंग, ऑईल एंड गैस २) टेक्सटाईल, रिटेल उद्योग ३) सेझ (SEZ) डेवलपमेंट
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
सिबर (रशिया) पेट्रोकेमिकल्स कंपनीसह करार
त्याद्वारे  ब्यूटील रबर उत्पादनात ४५० मी डॉलर गुंतवणार
कृष्ण – गोदावरी खोरेतील डी-६ नेचरल गैसचे उत्पादन करणार.(क्षमता: ५५ मी.मे.प्रतिदिन)
आर्थिक वर्ष २०१०
नफा ३.८३ % (रु. १६,२३६ करोड )

शेअर मार्केट मधील महत्वाच्या कंपन्या ची माहिती


मित्रानो , मी तुम्हाला शेअर मार्केट मधील महत्वाच्या कंपन्या ची   माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. आशी माहिती तुम्हाला कोठेच मराठीत भेटणार नाही. तर कृपया याचा फायदा घ्या .


बुधवार, २७ एप्रिल, २०११

काही लेख वाचनीय असतात, परंतु काही लेख फायदे देतात.


चला शेअर बाजाराकडे....­­
काही लेख वाचनीय असतात, परंतु काही लेख फायदे देतात.
          मराठी माणूस कमी होणा-या व्याजदरामुळे त्रस्त झाला आहे. गुंतवणूक कोठे करावी या चिंतेत गुंतून गेला आहे. अशावेळी कॉपी करण्याची गरज असते. परीक्षेत कॉपी करणे वाईट, परंतु नवीन व्यवस्थापन शास्त्र म्हणते, यशाकरिता तुम्ही यशस्वी माणसांची कॉपी करा. हा सर्वात सहज यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे.
          आता प्रश्न असा आहे की, मराठी माणसांनी गुंतवणुकीत यशस्वी होण्याकरिता कोणाची कॉपी करावी? उत्तर सोपे आहे, गुजराथी  माणसाची. पैशाला कसे कामाला लावावे व पैशापासून कसा पैसा बनवावा याची कला गुजराथी समाजाला चांगली अवगत आहे व याकरिता ते ज्या साधनाचा वापर करतात त्याला म्हणतात शेअर बाजार.
     मराठी माणूस म्हणेल, शेअर बाझार नको रे बाप्पा! शेअर बाजार म्हणजे सट्टा! लगी तो छ्कडी नही तो लकडी. मी मराठी माणसाचा कल्याणमित्र असल्याने मी म्हणतो की, ही धारणा चुकीची आहे. मी  मान्य करतो की, तुमच्या अवतीभवती अशी कितीतरी उदाहरणे असतील की, ज्यांनी शेअर बाजारात पैसा लावला व तो बुडाला. ज्यांचा पैसा बुडाला त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत, शेअर बाजार नाही. कारण शेअर बाजारात पैसा लावणे हा एक बुद्धिबळासारखा खेळ आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कितीही बुद्धिमान असलात व बुद्धिबळाच्या खेळाचे नियम तुम्हाला माहित नसतील, तर तुम्ही हराल. अगदी त्याप्रमाणे शेअर बाजारचे नियम तुम्हाला माहित नसतील तर तुमचा पोपट होईल.
     ज्यांनी आपले रुपये शेअर बाजारात गमावले ते सर्व खिलाडी नव्हते, तर अनाडी होते. नाही तर ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झले होते किंवा घाई करून पी हळद हो गोरी करायला गेले होते.
     ज्यांनी आपले रुपये शेअर बाजारात गमावले त्यांना फक्त खालील प्रश्न विचारा.
१)           जे शेअर तुम्ही घेतलेत ते शेअर बाजारातील प्रथम १०० कंपनीपैकी  
शेअर होते काय?
२)           जो आय.पी.ओ. तुम्ही घेतलात तो नावाजलेल्या ग्रुपचा होता का?
३)           जर दोन्ही उत्तरे हो असतील तर तो तुम्ही किती वर्षे ठेवलात की  
मंदीची आवई येताच विकलात व नंतर पस्तावलात?
४)           शेअर घेताना तुम्ही त्या शेअरचा हाय / लो, पी.इ., इ.पी.एस., परफौर्मेन्स चा अभ्यास केलात, की फक्त टिप्सवर शेअर खरेदी केला?

          वरील प्रश्नाची उत्तरे प्राप्त होताच तुम्हाला कळेल की, पैसे शेअर बाजाराने नव्हे तर गुंतवणूकदाराने आपल्या चुकीने बुडविले आहेत.
     तर मराठी माणसाने चुका न करता आपले रुपये शेअर बाजारात कसे लावावेत व त्यापासून कमीत कमी वर्षाला २० % फायदा कसा प्राप्त करावा याचेच मार्गदर्शन या लेखमालेतून वाचकांना करण्यात येणार आहे.
     शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या परिवाराचा मेडिक्लेम व कमवत्या व्यक्तीने स्वत:चा विमा उतरवणे गरजेचे आहे. कारण आजार व मृत्यू सत्य आहेत व ते आपण रोखू शकत नाही, मात्र त्याची तीव्रता कमी करू शकतो. तेव्हा हे करून जी रक्कम उरेल ती तुम्ही शेअर बाजारात लावा.
     शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खूप मोठी रक्कम असण्याची गरज नाही. अगदी प्रतिवर्ष रु.३००० /- गुंतवणुकीस सुरुवात केलीत व चांगल्या कंपनीचे शेअर घेतलेत तरी तुम्ही प्रतिवर्ष २० % वाढ संपत्तीत पहाल. जर तुमच्या हाती मल्टीपल होणारा शेअर लागला तर तेवढ्याच गुंतवणुकीत तुम्ही लखपती / करोडपती देखील होऊ शकतात.
     उदा.: ज्याने १ जानेवारी १९९६ रोजी रु. १००० चे फक्त्त इन्फोसिस टेक्नोलोजीसचे शेअर घेतले असतील, तर ३१ डिसेम्बर २००५ रोजी त्याचे मूल्य रु. १,२५,०००/- झाले होते. सांगा कोणती गुंतवणूक तुम्हाला इतका परतावा देऊ शकेल?
      अशा मल्टीपल करणा-या कंपन्या कोणत्या, हे सांगण्याचे काम आम्ही करू. शेअर बाजारातील नियम व मार्गदर्शनाचे काम आम्ही करू, परंतु वाचनाचे व निर्णय घेण्याचे काम मात्र तुम्हालाच करावे लागेल.
     हा लेख तुम्हाला शेअर बाजारचे महत्व सांगण्यात व तुमची मनोवृत्ती बाजारासाठी तयार करण्याकरिता होता. पुढील लेखात आपण शेअर व शेअरचे प्रकार यांची माहिती घेऊया. याशिवाय आठवड्याचा शेअर सुद्धा सांगण्यात येईल. तर तयार रहा शेअर बाजारचा खिलाडी बनण्याकरिता; कारण आपण आता गुजराथी समाजाची मक्तेदारी मोडून शेअर बाजारात मराठी माणसाचा ठसा उमटवण्याचे काम करणार आहोत. तेव्हा बेस्ट ऑफ लक!
                        -कल्याण मित्र  

गुरुवार, २४ मार्च, २०११

चला मराठीत शेअर मार्केट शिकूया

 मी आज चा मरठी माणसातील सर्वात हुशार शेअर मार्केट चा जाणकार आहे . मी technical  Analysis चा तद्न्य आहे. हे सर्व ज्ञान मी मराठी माणसाना देवू इच्छितो . मला तुम्ही facebook  वर share market tips  ग्रूप वर भेटू  शकता .


मी हे आवाहन करतो कि कोणी सुद्धा  मी जे तुम्हाला  सांगणार आहे ते सांगितले नसेल . हे ज्ञान नवीन आहे . व  खूप फायद्याचे सुधा आहे .

तर तेयार राहा .

खूप खूप रुपये कसे कमवायचे ते शिकायला.